Posts

Showing posts from September, 2015

INDIAN FESTIVAL

Image
 पोळा (बेंदूर)  श्रावण महिन्याची सुरवातच सणांची उधळण करणारी असते. नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, गोकुळाष्टमी या सणांबरोबरच सरत्या श्रावणात पिठोरी अमावस्येला संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जातो सर्जा-राजाचा सण म्हणजे 'पोळा' ।  आपल्या कृषीप्रधान भारत देशात बैलांना फार महत्व आहे. पोळा हा बैलांचा सण आहे. श्रावण अमावास्ये ला पोळा साजरा केला जातो. बैल म्हणजे श्रम म्हणजेच कष्ट. अशा कष्ट करणाऱ्याची पूजा म्हणजेच जो दुसऱ्या साठी  श्रम घेतो अशा श्रम देवतेची पूजा करण्याचा हा दिवस होय. या दिवशी फक्त बैलांचीच नव्हे तर शेतीसाठी लागणाऱ्या नांगर, विळी, कोयता, खोर इत्यादी साधनांची देखील पूजा केली जाते. सजीवाबरोबर निर्जीवा मध्येदेखील ईश्वर बघण्याची, त्याची पूजा करण्याची आपल्या संस्कृतीची परंपरा आगळीच म्हणावी लागेल. ‘शेतकऱ्याचा बैल आणि गरिबाची बायको आजारी पडू नये’ अशी एक ग्रामीण म्हण आहे. यावरूनच शेतकऱ्या साठी बैल किती महत्वाचा व अनिवार्य आहे हे समजेल. बैलाचे शेतकऱ्यावरती अनंत उपकार असतात व हे तो आयुष्यभर फेडू शकत नाही म्हणून कृतज्ञता व्यक्त करण्या साठी पोळा अत्य...